Ep. 03. Love ki Arrange? (Lockdown chya Goshti) | 'लव्ह की अरेंज?' (लॉकडाऊनच्या गोष्टी)
Manage episode 275446459 series 2813340
'लॉकडाऊनच्या गोष्टी' सिरीजमधील ही तिसरी गोष्ट! टायटलवरून तुम्हाला थोडाफार अंदाजा आलाच असेल की ही एका लग्नाची गोष्ट आहे. पण ज्यांचं लग्न व्हायचंय ते कपल आहे आजच्या पिढीतलं, ज्यांना पारंपरिक विवाह सोहळ्यात होणारा अनेक गोष्टींचा अपव्यय टाळावा असं वाटतं. पण त्यांचे आईवडील मात्र सगळ्याच ९० च्या दशकातील आईवडिलांसारखे आहेत. त्यातल्या त्यात यांना लव्ह मॅरेज करायचंय. इथेही घरचे नकार देतील अशीच शंका जास्त आहे. अशा सर्व छोट्या-मोठ्या अडचणींमधून शेवटी या कपलला मार्ग सापडतो की नाही आणि लॉकडाउनच्या काळात हे सगळं घडत असल्याने त्याचा यांच्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी ऐका आजचा एपिसोड, 'लव्ह की अरेंज?'
ही स्टोरी लिहिलीये शारदा भवर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on [email protected]
21 एपिसोडस